

मुंबईत गोदरेज टॉवरला आग
मुंबई : मुंबईतील आग्रीपाडा परिसरातल्या गोदरेज टॉवरला आग लागली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. नियमानुसार इमारतीच्या बांधकामाशी संबंधित कामं ...
आई वडिलांविषयी यू ट्युबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्यावरुन वादाला सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला फटकारले आणि पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले. मागील काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया गायब आहे. त्याच्या मुंबईतील घराला कुलुप आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला देश सोडण्यास बंदी घातली आहे. याच प्रकरणात राज्याच्या सायबर सेलने ५० सेलिब्रेटींना समन्स बजावले आहे. पोलिसांनी समन्स बजावलेल्यांपैकी पाच जणांचा जबाब नोंदवला आहे.महाराष्ट्र सायबर सेल सध्या इंडियाज गॉट लेटेंटच्या सर्व भागांची तपासणी करत आहे. यू ट्युबवरील कार्यक्रमासाठी पैसा नेमका कोणत्या मार्गाने येत होता आणि कसा वापरला जात होता, याचाही पोलिस तपास करत आहेत.