मुंबई : मुंबईतील आग्रीपाडा परिसरातल्या गोदरेज टॉवरला आग लागली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. नियमानुसार इमारतीच्या बांधकामाशी संबंधित कामं रात्री उशिरा केली जात नाहीत. मग गोदरेज टॉवरमध्ये रात्री उशिरा काम कसे सुरू होते असा प्रश्न विचारला जात आहे. आग प्रकरणी चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई होणार आहे.
अग्निमशन दलाने आग लागल्याची माहिती मिळताच कारवाई केली आणि काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.