मुंबई : लोअर परळ येथील ५५ वर्षीय तक्रारदार महिला लाकडी वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्या आपल्या पतीसह प्रयागराजला जाण्याचा विचार करत होत्या. त्यासाठी त्यांनी ७ फेब्रुवारी रोजी तंबू ऑनलाईन खरेदी करण्यासाठी इंटरनेटवर शोध घेतला. त्यावेळी त्यांना टेन्ट सिटी महाकुंभ नावाचे संकेतस्थळ सापडले. त्यात एक मोबाईल क्रमांक दिला होता. त्यावर संपर्क साधला असता काही कालावधीनंतर एका व्यक्तीने त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे दूरध्वनी केला. त्या व्यक्तीने त्यांची व सहप्रवाशांची माहिती घेतली.
तसेच दोन तंबू नोंदवण्यासाठी आगाऊ रकमेची मागणी केली. तक्रारदार महिलेने ३५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर सहा प्रवाशांच्या विमान तिकीटाच्या नावाखाली त्याच्याकडून दोन लाख ६१ हजार रुपये घेण्यात आले. थोडेथोडे करून तक्रारदार महिलेने एकूण तीन लाख ७८ हजार रुपये आरोपींना पाठवले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिलेचा फोन उचलणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
सायबर गुन्हे व ऑनलाइन फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी व रक्कम परत मिळवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. त्यासाठी तक्रारदार महिलेने रक्कम पाठवलेल्या बँक खात्याची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामाध्यमातून शोध सुरू आहे. तसेच या खात्यांमधील रक्कम गोठवण्याबाबतही विनंती करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…