
मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५(Champions Trophy 2025) या स्पर्धेला अखेर आजपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्याला सुरू होण्यासाठी फक्त काही तासच शिल्लक आहेत. यातला पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रंगत आहे.
तर टीम इंडियाचे हे मिशन बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापासून सुरू होणार आहे. यानंतर भारताची टक्कर पाकिस्तानशी २३ फेब्रुवारीला असेल. या वेळेस चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण ८ संघ सहभागी होत आहेत.
हे संघ सहभागी
यावेळेस जे आठ संघ भाग घेत आहेत त्यात भारताशिवाय पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश या संघांचा समावेश आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ आहेत तर ग्रुप बीमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे संघ आहेत. यावेळेस अफगाणिस्तान पहिल्यांदा स्पर्धेत खेळत आहे. तर वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसारखे मजबूत संघ यावेळेस चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकलेले नाहीत.
टीम इंडिया दुबईत खेळणार सर्व सामने
यावेळेस पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहेत. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरक्षेच्या कारणामुळे भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक
१९ फेब्रुवारी – पाकिस्तान वि न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची २० फेब्रुवारी – बांग्लादेश वि भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई २१ फेब्रुवारी – अफगानिस्तान वि दक्षिण अफ्रीका, नेशनल स्टेडियम, कराची २२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर २३ फेब्रुवारी – पाकिस्तान वि भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई २४ फेब्रुवारी – बांग्लादेश वि न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी २५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया वि दक्षिण अफ्रीका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी २६ फेब्रुवारी- अफगानिस्तान वि इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर २७ फेब्रुवारी – पाकिस्तान वि बांग्लादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी २८ फेब्रुवारी – अफगानिस्तान वि ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर १ मार्च – दक्षिण अफ्रीका वि इंग्लंड, नेशनल स्टेडियम, कराची २ मार्च – न्यूझीलंड वि भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
सेमीफायनल आणि फायनलचे सामने ४ मार्च – सेमीफायनल १, दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई ५ मार्च – सेमीफ़ायनल २, गद्दाफ़ी स्टेडियम, लाहोर ९ मार्च – फायनल – गद्दाफ़ी स्टेडियम, लाहोर (टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यास सामना यूएईमध्ये होईल.)