Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीEntertainment News : नाट्यविश्व, रंगमंचच्या कलादालन निर्मितीत ठक्कर कॅटरर्सचा अडसर

Entertainment News : नाट्यविश्व, रंगमंचच्या कलादालन निर्मितीत ठक्कर कॅटरर्सचा अडसर

दहा वर्षांसाठी मुंबई महापालिकेने पुन्हा वाढवून दिला भाडेकरार

मुंबई : गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या वास्तूचा पुनर्विकास करून ज्या जागेत मराठी नाट्य विश्व आणि मराठी रंगमंच कलादालनच्या निर्माणावर आता कायमचाच पडदा पाडला गेला. यासाठीची जागा ठक्कर कॅटरर्सला आता पुढील दहा वर्षांकरता देण्यात आली आहे. मराठी नाट्य विश्व आणि मराठी रंगमंच कलादालनाच्या निर्मितीत ठक्कर कॅटरर्स प्रमुख अडसर होता आणि कॅटरर्सकडून जागा काढून घेतल्यानंतरच याची निर्मिती करणे शक्य होते. परंतु कलादालनाची निर्मिती करण्याऐवजी महापालिकेने ठक्करला पुन्हा दहा वर्षांसाठी करार वाढवून देण्यात आला आहे.

गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेवर सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर दोन टप्प्यांमध्ये, मराठी रंगमंच कला दालनासाठी एकमेवाद्वितीय अशा स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय असा एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या भूखंडाची मालकी राज्य सरकारकडे आहे. काही वर्षांपूर्वी हा भूखंड राज्य सरकारने महापालिकेला भाडेतत्वावर दिला होता. त्यानंतर या जागेवर बिर्ला क्रीडा केंद्राची वास्तू बिर्ला समूहाने बनवली आणि सभागृह महापालिकेला सुपूर्द केला होता. आता या बाधकामासाठी पहिल्या टप्प्यात दोन तळमजले अधिक तीन मजली इमारतीचे टेरेस फ्लोअरसह काम करण्याचा आराखडा तयार केला. त्यात तळ मजल्यावर पार्किंगची व्यवस्था, पहिल्या मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत मराठी नाट्य विश्वाशी निगडित बांधकाम करण्यात येणार आहे. या वास्तूच्या बांधकामासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या कामांसाठीच्या कंत्राट कामासाठी निविदा मागवून मनीषा प्रोजेक्ट्स, सी.ई.इन्फा आणि आर अँड बी या एमसीआर जेव्ही या पात्र कंपनीची निवड करण्यात आली होती.

ST News : एसटीतून प्रवास करताना सुट्या पैशांची मिटणार चिंता

या वास्तूचे दोन टप्प्यात विकास केला जाणार आहे या वास्तूचा खर्च राज्य शासनाच्यावतीने केला जाणार असल्याने यासाठी १ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. परंतु तत्कालिन आघाडी सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही आणि पुढील महायुती सरकारनेही निधीची उपलब्ध करून न दिल्याने अखेर या कलादालनाचे कामच लाल फितीत अडकून पडले आहे.
आता हे काम हाती घेतल्यांनतर बिर्ला क्रीडा केंद्राची जागा ठक्कर कॅटरर्सला भाडेपट्ट्यावर दिलेली असल्याने त्यांनी ही जागा रिकामी करून देण्यास टाळाटाळ करण्यास सुरवात केली होती, त्यातच आता मुंबई महापालिकेने ऑक्टोबर २०२२ ते २०३२ पर्यंतच्या दहा वर्षांच्या कालावधीसाठी ठक्कर कॅटरर्सच्या भाडेकराराला मुदतवाढ दिली आहे. गिरगाव चौपाटी येथील उपाहार चालण्यासाठी ६५५ चौरस मीटरची जागा तसेच अतिरिक्त १३८२ चौरस फुटांची जागा भाडेकरारावर देण्यास दहा वर्षांकरता मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ठक्करचा गॉड फादर कोण असा प्रश्न उपस्थित होव लागला आहे.

या भाडेकरार मुदतवाढीमुळे महापालिकेला ठक्कर कॅटरर्सकडून मासिक ५.३५ लाख आणि ३.५९ लाख याप्रकारे एकूण सुमारे ९ लाख रुपये मासिक भाडे प्राप्त होत आहे. शिवाय प्रति लग्न एक लाख आणि अर्धा दिवसाकरता ४४ हजार रुपये वसूल केले जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -