Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

'...म्हणून छावा चित्रपटावरील करमणूक कर रद्द करू शकत नाही'

'...म्हणून छावा चित्रपटावरील करमणूक कर  रद्द करू शकत नाही'
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर साकारलेला छावा हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी देशभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. आता या चित्रपटाला करमणूक कर माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देताना करणमूक कर का रद्द करू शकत नाही याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



महाराष्ट्रात करमणूक कर रद्द झाला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेला करमणूक कर २०१७ मध्येच रद्द करण्यात आला आहे. यामुळे चित्रपटावरील करमणूक कर रद्द करण्याची मागणी झाली तरी आता करमणूक कर रद्द होऊ शकत नाही. रद्द करण्यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारितला करमणूक कर अस्तित्वात नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुण्यात शिवनेरी किल्ला येथे आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी करमणूक कराबाबतचा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणमूक कर या बाबतची राज्याची सध्याची स्थिती सांगितली.

Comments
Add Comment