मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने भारतात त्यांची नवीन उच्च-कार्यक्षम लक्झरी एसयूव्ही ऑडी आरएस क्यू८ च्या लाँच केली. याप्रसंगी ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों आणि विश्वविजेता ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा उपस्थित होते.
नवीन ऑडी आरएस क्यू८ या कारच्या भारतातील किंमतीची सुरुवात दोन कोटी ४९ लाखांपासून (एक्स-शोरूम) होत आहे. ही कार १०-वर्ष कॉम्प्लीमेण्टरी रोडसाइड असिस्टण्सच्या ओनरशीप फायद्यासह येते आणि आकर्षक सर्वसमावेशक मेन्टेनन्स व सर्विस पॅकेजेस देखील उपलब्ध आहेत.
क्षमता, अत्याधुनिकता आणि दैनंदिन उपयुक्ततेच्या प्रभावी एकत्रिकरणासह नवीन ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्स लक्झरीबाबत तडजोड न करता सर्वोत्तम कार्यक्षमतेची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. भारतात आमच्या आरएस मॉडेल्सना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामधून आम्हाला विशेषत: ऑडी आरएस क्यू८ चे जवळपास निम्मे ग्राहक असलेल्या तरूण ग्राहकांसाठी आमचा परफॉर्मन्स कार पोर्टफोलिओ विस्तारित करत राहण्यास प्रेरणा मिळाली आहे; असे ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले.
वैशिष्ट्ये :
- शक्तिशाली ४.० लिटर व्ही८ टीएफएसआय इंजिनची शक्ती, जे अपवादात्मक कार्यक्षमतेसाठी ६४० एचपी शक्ती आणि ८५० एनएम टॉर्कची निर्मिती करते.
- विनासायास पॉवर डिलिव्हरी आणि डायनॅमिक प्रतिसादासाठी सहजपणे शिफ्ट होणारे एट-स्पीड टिप्ट्रॉनिक ट्रान्समिशन.
- फक्त ३.६ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते, तसेच ३०५ किमी/तासचा पर्यायी टॉप स्पीड, ज्यामधून रोमांचक गतीचा अनुभव मिळतो.
- अद्वितीय हाताळणी व नियंत्रणासाठी क्वॉट्रो परमनण्ट ऑल-व्हील ड्राइव्हसह स्पोर्ट डिफेन्शियलने सुसज्ज.
- अॅडप्टिव्ह एअर सस्पेंशन, तसेच सानुकूल राइड अनुभवासाठी स्पोर्टसह अॅक्टिव्ह रोल स्टेबिलायझेशन.
- सुधारित स्टॉपिंग पॉवरसाठी ब्ल्यू, रेड किंवा अॅन्थ्रासाइट ब्रेक कॅलिपर्ससह आरएस सिरॅमिक ब्रेक्स उपलब्ध आहेत.
- आरएस-स्पोर्ट एक्झॉस्ट सिस्टम संपन्न, डायनॅमिक टोन देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी रस्त्यावर रोमांचक ड्राइव्हमध्ये अधिक उत्साहाची भर करते.
- ऑल-व्हील स्टीअरिंग उच्च गतीमध्ये देखील प्रभावी मनुव्हरिंग, स्पोर्टी हाताळणी, आत्मविश्वासपूर्ण व आरामदायी ड्रायव्हिंगची खात्री देते.
- एचडी मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्ससह ऑडी लेझर लाइट, जे अपवादात्मक प्रकाश आणि लक्षवेधक उपस्थिती देते.
- आरएस-विशिष्ट स्टायलिंगमध्ये आकर्षक व डायनॅमिक लुकसाठी आक्रमक डिझाइन घटक आहेत.
- आर२३ व्हील्स विशिष्ट डिझाइन्समध्ये ऑफर करण्यात आले आहेत:
- स्टॅण्डर्ड: ६-वाय-ट्विन-स्पोक, मॅट निओडायमियम गोल्ड
- ब्लॅक मेटलिक किंवा सिल्क मॅट ग्रेमध्ये जवळपास ६ पर्याय उपलब्ध आहेत.
- आरएस रूफ एज स्पॉयलर आणि आरएस स्पोर्ट एक्झॉस्ट सिस्टम, ज्यामधून कारची स्पोर्टी आणि कार्यक्षमता-केंद्रित विशिष्टता दिसून येते.
- अधिक वैयक्तिकरणासाठी ब्लॅक स्टायलिंग पॅकेज आणि ब्लॅक स्टायलिंग पॅकेज प्लस पर्याय.
- अत्याधुनिक फिनिशसाठी मॅट ग्रेमध्ये एक्स्टीरिअर मिरर हाऊसिंग्ज.
- स्टॅण्डर्ड एक्स्टीरिअर रंग: मिथोस ब्लॅक, ग्लेशियर व्हाइट, डेटोना ग्रे, अस्कारी ब्ल्यू, चिली रेड, साखीर गोल्ड, सॅटेलाइट सिल्व्हर, वेटोमो ब्ल्यू.
- ऑडी एक्सक्लुसिव्ह रंग: मिसानो रेड पर्ल इफेक्ट, डीप ग्रीन पर्ल इफेक्ट, सेपांग ब्ल्यू पर्ल इफेक्ट, आयपनेमला ब्राऊन मेटलिक, जावा ग्रीन मेटलिक, हवाना ब्लॅक मेटलिक, जावा ब्राऊन मेटलिक, सियाम बीज मेटलिक, कॅरॅट बीज मेटलिक.
- इंटीरिअर रंग पर्याय: ब्लॅकसह ब्लॅक स्टिचिंग, ब्लॅकसह रॉक ग्रे स्टिचिंग, ब्लॅकसह ब्ल्यू स्टिचिंग, ब्लॅकसह एक्स्प्रेस रेड स्टिचिंग आणि कॉग्नक ब्राऊनसह ग्रॅनाईट ग्रे स्टिचिंग.
- ४-झोन क्लायमेट कंट्रोलसोबत सुधारित केबिन कम्फर्टसाठी एअर आयोनायझर आणि फ्रॅग्रॅन्स फंक्शन.
- वैयक्तिकृत आरामदायीपणासाठी पॉवर-अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह मेमरी फंक्शन.
- ड्राइव्ह करताना अधिक लक्झरीसाठी फ्रण्ट सीट व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्शन.
- प्रभावी पार्किंग आणि अधिक सुरक्षिततेसाठी पार्क असिस्ट प्लससह ३६०-डिग्री कॅमेरा सिस्टम.
- सुरक्षित व युजर-अनुकूल एण्ट्री आणि एक्झिटसाठी पॉवर लॅचिंग डोअर्स.
- ऑप्शनल पॅनोरॅमिक सनरूफ, जे केबिनमध्ये नैसर्गिक प्रकाश येण्याची सुविधा देते.
- ड्राइव्ह करताना विनासायास कनेक्टीव्हीटीसाठी ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग.
- एक्स्टीरिअर मिरर्स, जे पॉवर-अॅडजस्टेबल, हीटेड असण्यासोबत इलेक्ट्रिकली फोल्ड करता येतात, तसेच अधिक सोयीसुविधेसाठी दोन्ही बाजूस ऑटो-डिमिंग आणि मेमरी फंक्शन.
- लगेज कम्पार्टमेंट लिड, जे सोईस्करपणे उपलब्ध होण्यासाठी इलेक्ट्रिकली ऑपरेट करता येते.
- ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लसमध्ये सुधारित ड्रायव्हिंग अनुभवासाठी आरएस-विशिष्ट लेआऊट आहे.
- उच्च दर्जाचा आरामदायीपणा व सपोर्टसाठी प्रीमियम व्हॅल्कोना लेदरमध्ये अपहोल्स्टरी केलेल्या फ्रण्ट स्पोर्ट सीट्स.
- अधिक आरामदायीपणासाठी फ्रण्ट सीट हीटिंग आणि चारही बाजूने लम्बर सपोर्ट.
- अधिक वैविध्यता आणि आरामदायीपणासाठी रिअर सीट बेंच प्लस, जे स्थिर सीटिंग व्यवस्था देते.
- स्पोर्टी व अत्याधुनिक इंटीरिअरसाठी अॅल्युमिनिअम रेस आणि अॅन्थ्रासाइटमध्ये उपलब्ध इनलेज.
- प्रीमियम ऑडिओ सिस्टम्सचा पर्याय:
- स्टॅण्डर्ड: प्रभावी साऊंड क्वॉलिटीसाठी बँग अँड ओल्युफसेन ३डी प्रीमियम साऊंड सिस्टमसह १७ स्पीकर्स आणि ७३० वॅट आऊटपुट.
- ऑप्शनल: अद्वितीय ऑडिओ अनुभवासाठी बँग अँड ओल्युफसेन ३डी प्रीमियम साऊंड सिस्टमसह २३ स्पीकर्स आणि १,९२० वॅट आऊटपुट.
- सर्वोत्तम नियंत्रण आणि सहज नेव्हिगेशनसाठी एममएआय नेव्हिगेशन प्लससह एमएमआय टच रिस्पॉन्स.
- अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस परिपूर्ण वातावरण निर्मितीसाठी ३० कलर पर्याय देते.
- नकळत लेन ड्रिफ्टिंगला प्रतिबंध होण्यास मदत करण्यास डिझाइन करण्यात आलेली लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम.
- प्रवाशांच्या सर्वसमावेशक संरक्षणासाठी संपूर्ण केबिनमध्ये धोरणात्मकरित्या बसवण्यात आलेल्या सहा एअरबॅग्ज.
- गतीशीलपणे ड्रायव्हिंग करताना अधिक वेईकल स्थिरता व नियंत्रणासाठी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल.
- लांबच्या प्रवासादरम्यान अधिक आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवासाठी क्रूझ कंट्रोलसह स्पीड लिमिटर.
- १०-वर्ष कॉम्प्लीमेण्टरी रोडसाइड असिस्टण्स.
- आकर्षक सर्वसमावेशक मेन्टेनन्स आणि सर्विस पॅकेज उपलब्ध.