Thursday, May 15, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Mumbai News : मुंबईतील जुना प्रभादेवी पूल लवकरच पाडणार?

Mumbai News : मुंबईतील जुना प्रभादेवी पूल लवकरच पाडणार?

मुंबई  : पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रभादेवी आणि मध्य रेल्वे मार्गावरील परळ रेल्वे स्थानकांवरील महत्त्वाचा असा १२५ वर्षे जुना प्रभादेवी उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर या पुलाचे पाडकाम करण्यात येणार असून ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग आहे. दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने प्रभादेवी उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे.



प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणारा हा पूल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाकडे जातो. परळमधील महत्त्वाच्या अशा टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालय आणि वाडिया रुग्णालयात जाण्यासाठी रेल्वे प्रवासी, पादचारी तसेच वाहनचालक-प्रवाशांना याच पुलाचा वापर करावा लागतो. हा पूल दादरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणालाही जोडतो. एकूणच वाहतुकीच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. प्रभादेवी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून लवकरच या पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा शिवडी – वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत हे पाडकाम करावे लागत आहे.

Comments
Add Comment