नवी दिल्ली : चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पादचारी पुलावर अनावश्यक थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच स्थानकावर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले असून गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी काही दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी सुरक्षा उपाय करण्यात आले आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांवर विशेष देखरेख ठेवली जाईल, अशाच प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा पथके प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे निरीक्षण करणार आहेत, अशी माहिती आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यावेळी दिली.
सदर घटनेनंतर गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने २६ फेब्रुवारीपर्यंत दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत काऊंटरवरून प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबवली आहे. भविष्यात रेल्वे स्थानकांवर गर्दीच्या काळात चेंगराचेंगरीसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वेने देशातील ६० प्रमुख स्थानकांवर होल्डिंग एरिया तयार करण्याची योजना आखली आहे.
आम्ही अनेक लोकांना विनाकारण पादचारी पुलावर वाट पाहताना किंवा उभे असल्याचे पाहिले आहे, ज्यामुळे इतर प्रवाशांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यास विलंब होत आहे.
आता, वैध कारणाशिवाय कोणालाही पादचारी पुलावर उभे राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्लॅटफॉर्म क्रमांक १६ ते प्लॅटफॉर्म क्रमांक १३ पर्यंत, आम्ही प्रत्येक ट्रेनच्या डब्याचे निरीक्षण करण्यासाठी आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय, गरजेनुसार आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज असतील, असे अधिकाऱ्याने सांगितले.
रविवारी असंख्य प्रवाशांनी रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्याने स्टेशनवर गर्दी झाली होती, त्यामुळे गर्दी हाताळण्यासाठी दिल्ली पोलीस, आरपीएफ आणि सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी)मधील अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पुढील कोणतीही घटना टाळण्यासाठी आम्ही बॅरिकेड्स उभारले आहेत, गस्त वाढवली आहे आणि जलद प्रतिक्रिया पथके तैनात केली आहेत, असे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चेंगराचेंगरीच्या चौकशीत असे दिसून आले की, रेल्वेने नवी दिल्ली स्थानकावर दर तासाला १,५०० जनरल तिकिटे विकली आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की, रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांची तैनाती पुरेशी नव्हती, ज्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यात अडचणी निर्माण झाल्या आणि परिस्थिती आणखी बिकट झाली. घटनेच्या दोन तास आधी (१५ फेब्रुवारी रोजी) रेल्वेने एका तासात २६०० जनरल तिकिटे विकली होती. साधारणपणे एका दिवसात ७ हजार तिकिटे विकली जात असत; परंतु या दिवशी ९६०० तिकिटे विकली गेली असल्याचे समजते.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…