
ओटावा : कॅनडातील टोरंटो विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाला आहे. डेल्टा एअरलाइन्सचे विमान सोमवारी (१७ फेब्रुवारी ) लँडिंग करताना बर्फाळ जमिनीमुळे उलटले.विमानातील ७६ प्रवाशांपैकी १७ जण जखमी झाले असून सुदैवाने या घटनेत जीवीत हानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, डेल्टा एअरलाइन्सचे हे विमान अमेरिकेतील मिनेसोटा येथून टोरंटो विमानतळावर उतरणार होते. मात्र, विमान लँडिंग दरम्यान बर्फाळ जमिनीमुळे विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते उलटले.या विमानात 76 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्ससह ८० प्रवासी होते. या अपघातात विमानातील ७६ प्रवाशांपैकी १७ जण जखमी झाले आहेत. ज्यात तीन गंभीर आहेत. गंभीर प्रवाशांमध्ये एक लहान मुलगा असून ६० वर्षीय एक पुरुष आणि ४० वर्षीय महिला आहे. किरकोळ दुखापत झालेल्या जखमींना रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरने परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पॅरामेडिक सर्व्हिसेसचे लॉरेन्स सँडन यांनी दिली.

नंदुरबार : पुन्हा एकदा हिट अँड रनची चित्तथरारक घटना समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात हिट अँड रन प्रकरणात आई आणि मुलासह त्यांच्या कुत्र्याचा गाडीखाली ...