
पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात अचानक मृत डुकरांच्या संख्येत वाढ झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने याचा तपास केला असता हे मृत्यू विषबाधा झाल्यामुळे उघडकीस आले आहे. डुकरांच्या रक्त नमुन्यांचीही सध्या तपासणी सुरू आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांचा त्रैमासिक प्रगती अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या लक्षणीयरित्या ...
पुण्यातील कोथरूड परिसरात डुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने याचा तपास केला. कोथरूडमध्ये भारती नगर नाला आणि भिमाले कॉर्नर परिसरात ६ फेब्रुवारीपासून मृत डुकरे आढळून येत आहेत. आतापर्यंत या परिसरात ५४ मृत डुकरे आढळली आहेत. यातील एका डुकराचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या रोग नियंत्रण केंद्राने या डुकराच्या अवयवांची तपासणी केली. डुकराच्या अवयवांमध्ये कार्बामेट हे विष आढळून आले. त्यामुळे या डुकरांवर विषप्रयोग झाला असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान या मृत डुकरांना विषबाधा कशातून झाली याचा महापालिका आरोग्य विभागाने नेमलेले भरारी पथक परिसरात अधिक तपास करत आहेत.