
ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून गॅसवाहिनी फुटल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथे घडली. यामुळे गॅस गळती होऊन त्याचा फटका ५० ग्राहकांना बसला. दुपारपर्यंत गॅसवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते.

पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिवजयंती उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री ...
घोडबंदर रोडवर वाघबीळ नाका येथे जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅस वाहिनीमध्ये गळती सुरू झाली. याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच घटनास्थळी महानगर गॅस कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच त्या गॅस वाहिनीचा मुख्य वॉल्व बंद केल्यानंतर दुरुस्तीचे काम महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी हाती घेतले. या घटनेमुळे वाघबीळ नाका परिसरातील सुमारे ५० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत झाला. त्या गॅसवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.