पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिवजयंती उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली.
यंदाच्या वर्षी शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवासाठी येणाऱ्यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी आकर्षक कमानी उभारण्यात आल्या आहेत. शिवनेरी किल्ला पूर्ण विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे. पर्यटन विभाग जिल्हा प्रशासनाकडून तीन दिवसांच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
INS Guldar : विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आयएनएस गुलदार युद्धनौका
शहरात सर्वत्र आकर्षक मंडप उभारण्यात आले असून त्यावर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पूर्ववेस ते शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत केलेली विद्युत रोषणाई शिवभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.