
गुजरात : सध्या मनोरंजन क्षेत्रातील 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ८ सिनेमांचा रेकॉर्ड मोडला आहे. 'छावा' ने भारताचेच नाही तर भारताबाहेरील प्रेक्षकांचीही मने जिंकली आहेत. 'छावा' बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच गुजरातमध्ये 'छावा' च्या स्क्रिनिंग दरम्यान एका प्रेक्षकाने थिएटरमधला पडदा फाडल्याची व्हिडिओ व्हायरल झाली आहे.

पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात अचानक मृत डुकरांच्या संख्येत वाढ झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने याचा तपास केला असता हे ...
गुजरातमधील भरुच येथे रविवारी (दि १६) रात्री ११:४५ चा छावा चित्रपटातील क्लायमेक्स सुरू होताच प्रेक्षकाने थिएटरमधला पडदा फाडला. 'छावा'मध्ये औरंगजेब संभाजी महाराजांना कैद करतो आणि महाराजांचा छळ करतो. हा सीन सुरू होताच प्रेक्षकाने उठून थिएटरमधील पडदा फाडत त्याचं नुकसान केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रेक्षकाने पडद्याचे नुकसान केल्याने थिएटर मालकाने याची माहिती पोलिसांना दिली. थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या आरोपीचं नाव जयेश वसावा असं आहे.
दरम्यान 'छावा' ऑनलाईन जरी लिक झाला असला तरी प्रेक्षकांनी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यास जास्त पसंती दर्शवली आहे. छावाची गेले ४ दिवसांची कमाई १४० कोटी आहे.