अकोले तालुक्यातील घटना; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
अकोले : तालुक्यात वारंवार मुलींवर आत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने पालक वर्गात चिंता व्यक्त होत असतानाच तालुक्यातील ग्रामीण भागातून खळबळजनक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने केवळ पाच वर्षाचे वय असलेल्या चिमुकलीवर अत्याचार केला. पोलिसांनी या नराधमावर पोस्को अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने अकोले पोलिसात फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी आरोपी नराधम आकाश संतु कासार (रा. शेरणखेल, तालुका अकोले) याच्यावर पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास आरोपी कासार याने ५ वर्षीय बालिकेला आईने घरी बोलवले आहे, असे सांगुन आरोपी कासार याने तिला स्वतःच्या घरी नेले.तेथे पिडीत बालिकेवर लैंगिक अत्याचार केला.
महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी योग्य नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल
याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात आरोपी आकाश कासार याच्याविरुद्ध पोस्को कायदा कलम ४,८,१२,०९ ( एम ), सहकलम अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(२ ) (व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करत आहेत.