Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीमहाकुंभातील पाणी आंघोळीसाठी योग्य नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी योग्य नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला सादर केला अहवाल

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभात आतापर्यंत सुमारे ५५ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्थान केले आहे. परंतु, हे पाणी आंघोळीसाठी योग्य नसल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) दिला आहे. सीपीसीबीने सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला (एनजीटी) सादर केलाय. सीपीसीबीने ९ ते २१ जानेवारी दरम्यान प्रयागराजमधील गोळा केलेल्या ७३ नमुन्यांवर हा अहवाल बनवण्यात आला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या अहवालात गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याची एकूण 6 पॅरामीटर्सवर चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये pH म्हणजे पाणी किती आम्लयुक्त किंवा अल्कधर्मी आहे, मल कोलायटिस, BOD म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन मागणी, COD म्हणजे रासायनिक ऑक्सिजन मागणी आणि विरघळलेला ऑक्सिजन यांचा समावेश आहे. या सहा पॅरामीटर्सवर ज्या ठिकाणांहून नमुने घेण्यात आले त्यापैकी बहुतेक ठिकाणी, विष्ठेतील कोलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले. याशिवाय, पाण्याची गुणवत्ता इतर ५ पॅरामीटर्सच्या मानकांनुसार आहे. नदीच्या पाण्यात फेकल कोलिफॉर्म नावाचा जीवाणू आढळतो. सामान्य परिस्थितीत, एक मिलीलीटर पाण्यात १०० बॅक्टेरिया असावेत. पण अमृत स्नानाच्या फक्त एक दिवस आधी, यमुना नदीच्या नमुन्यात फेकल कोलिफॉर्म २३०० आढळून आले.

PM Narendra Modi : कतारशी संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी तोडले सर्व ‘प्रोटोकॉल’!

संगममधून घेतलेल्या नमुन्यात, एका मिली पाण्यात १०० ऐवजी २ हजार विष्ठेतील कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळून आले. त्याचप्रमाणे, एकूण मल कोलिफॉर्म ४५०० आहे. गंगा नदीवरील शास्त्री पुलावरून घेतलेल्या नमुन्यात मल कोलिफॉर्म बॅक्टेरिया ३२०० आणि एकूण मल कोलिफॉर्म ४७०० आहेत. संगमापासून दूर असलेल्या भागात दोघांची संख्या कमी आहे. फाफामौ क्रॉसिंगजवळून घेतलेल्या नमुन्यात, एका मिलीलीटर पाण्यात १०० ऐवजी ७९० फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळले. त्याचप्रमाणे, राजापूर मेहदौरीमध्ये ते ९३० असल्याचे आढळून आले. झुसी येथील छतनाग घाट आणि एडीए कॉलनीजवळ त्याची मात्रा ९२० आढळून आली.

नैनीतील अरैल घाटाजवळ ते ६८० होते. राजापूरमध्ये ते ९४० असल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांनुसार, ते क श्रेणीत येते. यामध्ये, शुद्धीकरण आणि निर्जंतुकीकरणाशिवाय पाणी आंघोळीसाठी देखील वापरले जाऊ शकत नाही.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या अहवालात गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याची एकूण 6 पॅरामीटर्सवर चाचणी करण्यात आली आहे. यातील पाण्याचा pH किती आहे..?त्यात आम्लयुक्त किंवा क्षारीय, मल कोलिफॉर्म, बीओडी म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, सीओडी म्हणजे रासायनिक ऑक्सिजन डिमांड आणि विरघळलेला ऑक्सिजन समाविष्ट आहे.या ६ पॅरामीटर्सवर ज्या ठिकाणांहून नमुने घेण्यात आले त्यापैकी बहुतेक ठिकाणी, विष्ठेतील कोलिऑर्म बॅक्टेरियाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले. याशिवाय, पाण्याची गुणवत्ता इतर 5 पॅरामीटर्सच्या मानकांनुसार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -