Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Pune Cafe News : ऑनलाईन ऑर्डर करताय मग सावधान ! पुण्यात चॉकलेट मिल्कशेकमध्ये आढळला उंदीर मामा

Pune Cafe News : ऑनलाईन ऑर्डर करताय मग सावधान ! पुण्यात चॉकलेट मिल्कशेकमध्ये आढळला उंदीर मामा
पुणे : पुण्यातून किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील एका नामवंत कॅफेमधील चॉकलेट मिल्कशेकमध्ये मृत उंदीर सापडल्याचा संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी याची दखल घेत पुढील चौकशी सुरु केली आहे.
पुण्यातील लोहगाव येथील नामांकित कॅफेमधून व्हॅलेंटाईन डेला एका तरुणाने घरबसल्या चॉकलेट मिल्कशेक मागवले होते. त्या तरुणाने व त्याच्या मित्राने हे चॉक्लेटमिल्कशेक फस्त केल्यानंतर ग्लासाच्या तळाशी त्यांना मृत झालेला उंदीर आढळला. यानंतर हे दोघेही तरुण घाबरले. त्यांनी तडक रुग्णालयात धाव घेतली. आता त्यांची प्रकृती ठीक असून त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी कॅफेला भेट देऊन पुढील तपास सुरु केला आहे.
Comments
Add Comment