मुंबई: भारताचा क्रिकेटर अजिंक्य रहाणे गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर आहे. आता त्याचे म्हणणे आहे की न्यूजमध्ये राहणे गरजेचे आहे कारण लोक विचार करतात की मी चर्चेच्या बाहेर आहे.
एका वेबसाईटनुसार रहाणेला काही लोकांनी सल्ला दिला आहे की त्याने आपले म्हणणे समोर मांडले पाहिजे. तसेच आपल्या मेहनतीबद्दल सांगितले पाहिजे आणि नेहमी चर्चेत राहिले पाहिजे.
रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतरही संघातून बाहेर काढण्यात आले होते. यानंतर रहाणे सातत्याने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय कसोटी संघात परतण्याचा प्रयत्न करत आहे.
रहाणेने रणजी ट्रॉफी २०२४-२५मध्ये आतापर्यंत १२ डावांमध्ये ४३७ धावा केल्यात. त्याने क्वार्टरफायनलच्या सामन्यात हरयाणाविरुद्ध शतक ठोकले होते. रहाणेचे म्हणणे आहे की त्याच्यात आजही क्रिकेट शिल्लक आहे. भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे हे त्याचे लक्ष्य आहे. त्याच्याकडे कोणतीही पीआर टीम नाही. त्याचे क्रिकेटच पीआर आहे.