Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीPen Temprature : पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली, नागरिकांना जाणवू लागल्या उन्हाच्या...

Pen Temprature : पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली, नागरिकांना जाणवू लागल्या उन्हाच्या झळा

पेण : रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांसह पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता अचानक वाढली आहे. तालुक्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तापमान अचानक १ अंश सेल्सिअसने वाढले असून रात्री मात्र थंडी जाणवत आहेत. दिवसा उन्ह व रात्री गुलाबी थंडीमुळे शरीरावर विचित्र परिणाम होऊन आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील काही दिवसांत हवेच्या वरच्या स्थरात असलेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती आणि उत्तरेत थंडीच्या लाटांसह थंड हवेचे झोत येण्याची शक्यता नसल्यामुळे रायगड जिल्ह्यासह देशभरात फेब्रुवारी महिन्याच्या उर्वरीत दिवसांमध्ये उन्हाच्या झळांची तीव्रता वाढणार आहे.

मुंबईत मानवतेला काळिमा फासणारी घटना, जन्मदात्याने चार वर्षांच्या मुलीला जमिनीवर आपटून मारले

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सोमवारपासून हवेच्या वरच्या स्थरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तरेत असलेले थंड वारे जिल्ह्यापर्यंत येणार नाहीत. शिवाय पुढील आठवडाभरात थंड हवेचे झोत अथवा थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे उत्तरेतून थंड हवा येण्याची शक्यता मावळली आहे.

पेण तालुक्यात ग्रामीण भागासह शहरी भागात तापमान वाढ झालेली दिसून येत आहे. त्यात भर म्हणून अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत असल्यामुळे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. पुढील काळात तापमानात आणखी एक अंश सेल्सिअसने वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. थंड हवेचे झोत म्हणजेच थंड वारे येण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे पहाटेच्या तापमानात वाढ होऊन तापमान स्थिर झाले आहे.

त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. या महिन्याच्या अखेरीपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होऊन पेणकरांना होळी सणापूर्वी पासूनच उन्हाळ्याची चाहूल लागेल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -