मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक (Megablock) घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेकडून बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे रुळांसह सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीसाठीची कामे या कालावधीत करण्यात येतात. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीमा मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ ब्लॉकवेळेत अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द तर काही सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
Eknath Shinde : कॅलिफोर्नियाला कोकणासारखे व्हावेसे वाटायला लावणारे काम करू- एकनाथ शिंदे
तसेच हार्बर रेल्वे कुर्ला ते वाशी या सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान लोकल फेऱ्या वेळापत्रकाप्रमाणे उपलब्ध असणार आहेत.
तर पश्चिम रेल्वे बोरिवली ते गोरेगाव ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावरून धावणार आहेत. यामुळे काही धीम्या-जलद लोकल रद्द राहणार आहेत. त्यामुळे अन्य फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.