Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

रिक्षाचालक मुजाहिदने केली माजी आमदाराची हत्या

रिक्षाचालक मुजाहिदने केली माजी आमदाराची हत्या
बेळगावी : कर्नाटकमधील बेळगावी जिल्ह्यात रिक्षा चालक मुजाहिदने गोव्याचे माजी आमदार लवू मामलतदार (६८) यांची हत्या केली. ते २०१२ ते २०१७ या कालावधीत फोंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.



माजी आमदार लवू मामलतदार यांची कार आणि मुजाहिदची रिक्षा यांची बेळगावी जिल्ह्यातील श्रीनिवास लॉज जवळच्या रस्त्यावर टक्कर झाली. यानंतर रिक्षा चालक मुजाहिदने गोव्याचे माजी आमदार लवू मामलतदार यांना मरेपर्यंत बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. मारहाणीच्याआधी माजी आमदार लवू मामलतदार आणि मुजाहिद या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर मुजाहिदने माजी आमदार लवू मामलतदार यांना मरेपर्यंत बेदम मारहाण केली.



पोलिसांनी रिक्षा चालक मुजाहिदला गोव्याचे माजी आमदार लवू मामलतदार यांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. मुजाहिद विरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
Comments
Add Comment