Railway Megablock : प्रवाशांचे होणार हाल! उद्या तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : प्रत्येक रविवारी मुंबई लोकलबाबत (Mumbai Local) तांत्रिक बिघाड दुरुस्तीची किंवा इतर कामे हाती घेतली जातात. त्यामुळे रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. यावेळी काही रेल्वेगाड्या रद्द केल्या जात असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचे दिसून येते. अशातच उद्या रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. उद्या (दि.१६) रोजी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी उद्या रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, उद्या मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० वाजून ५५ मिनिटं ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांच्या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेतला जाणार आहे.



मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक (Central Railway)


ब्लॉकच्या वेळांमध्ये (CSMT) सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल, जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या वेळेत सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढील स्थानकावर लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जातील.



पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक (western railway)


पश्चिम रेल्वेवर बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत गोरेगाव – बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे, तर अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहे.



हार्बर मार्गवरील मेगाब्लॉक (Harbour Line)


हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेतला जाईल. सकाळी ११ वाजून १० मिनिट ते दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक लागू असणार आहे. यादरम्यान सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशीच्या अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येतील. ब्लॉक काळात प्रवाशांसाठी सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी मार्गांवर मात्र विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ब्लॉक काळात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करु शकतील, असेही रेल्वे विभागाने सांगितले आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)