मुंबई : देशात विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे वीज निर्मितीचे विविध पर्याय शोधले जात आहेत. पवन उर्जा, सौर उर्जा यासारख्या अक्षय उर्जा प्रकल्पांवर भर दिला जात आहे. परंतु त्यापेक्षा वेगळा प्रयोग मुंबईत होणार आहे. मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. केंद्र सरकारचे स्वामित्व असलेली भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (बीपीसीएल) हा प्रकल्प सुरु करणार आहे.
त्यासाठी इस्त्रायलच्या कंपनीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मितीची देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट मुंबईत होत आहे. दिल्लीत ‘इंडिया एनर्जी वीक’ (IEW) कार्यक्रम झाला. त्यात देशाच्या वाढत्या इंधन आणि ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
Love Jihad : लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्यात धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात विशेष समिती गठीत
या अंतर्गत बीपीसीएलने मुंबई महासागरासारख्या समुद्र किनारी अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मितीचे नियोजन केले आहे. बीपीसीएल आणि इस्त्रायलची इको वेव पॉवर या कंपनीत समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती प्रकल्पाबाबत करार होणार आहे. मुंबईच्या समुद्र किनारी १०० किलोवॅट वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. इस्त्रायलमध्ये इको पॉवर कंपनीने हा प्रकल्प यशस्वी केला आहे. यासंदर्भातील करारावर या आठवड्यात हस्ताक्षर होण्याची शक्यता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.