Tuesday, May 13, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसिंधुदुर्ग

Nitesh Rane : जि. प. सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा; पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश

Nitesh Rane : जि. प. सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा; पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश

कणकवली  : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन ते आढावा सभा घेणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कणकवली, तर दुपारी ३ वाजता मालवण तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामाचा ते आढावा घेतील.



१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ, तर दुपारी ३ वाजता वेंगुर्ले तालुक्याचा आढावा घेणार आहेत. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी तालुक्याचा आढावा घेतील, तर दुपारी ३ वाजता देवगड तालुक्याचा आढावा घेणार आहेत. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी तालुक्याचा व दुपारी ३ वाजता दोडामार्ग तालुक्याचा आढावा घेणार आहेत.

Comments
Add Comment