DBS Realty : 'डीबीएस रिऍलिटी कंपनी' च्या चांदिवलीतील १८ मालमत्तांवर टाच

  81

कंपनीकडून एकूण १७८ कोटी ६४ लाख रूपयांचा कर थकवल्याने महानगरपालिकेकडून कारवाई

थकीत करभरणा न केल्यास होणार मालमत्तांचा लिलाव


मुंबई : मालमत्ताकर थकविणा-या मोठ्या थकबाकीदारांविरोधात मुंबई महानगरपालिकेने जप्ती,लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने 'डीबीएस रिऍलिटी कंपनी' च्या (DBS Realty) चांदिवली येथील एकूण १८ मालमत्तांवर टाच आणली आहे. या थकबाकीदार कंपनीकडे एकूण १७८ कोटी ६४ लाख रूपयांची थकबाकी असून थकबाकीदार कंपनीने निश्चित केलेल्या २१ दिवसात करभरणा न केल्यास मालमत्ता लिलावाची कार्यवाही केली जाईल.


महानगरपालिका प्रशासनाने सातत्याने आवाहन करुन आणि पाठपुरावा केल्यानंतरही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जप्ती आणि अटकावणीची कठोर कारवाई करण्यात येत आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी - व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे.



महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी,अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार आणि सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. परंतु , कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.


महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षात ६ हजार २०० कोटी रूपये कर संकलन उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या दृष्टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे. २६ मे २०२४ ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ४ हजार ८२३ कोटी रूपयांचे कर संकलन झाले आहे. म्हणजेच ३१ मार्च २०२५ पर्यंत उर्वरित १ हजार ३७७ कोटी रूपयांचे कर संकलन करावे लागणार आहे. कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणा-या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहेत. विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम २०३, २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करुन लिलाव केला जाणार आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक २५९२ / २०१३ च्या अंतरिम आदेशान्वये जर संबंधित मालमत्तेकडून येणे अपेक्षित कर वसूल न झाल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.


याच पार्श्वभूमीवर मालमत्ताकर थकविणा-या मोठ्या थकबाकीदारांविरोधात जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत करनिर्धारण व संकलन खात्याने संघर्षनगर–चांदिवली येथील 'डीबीएस रिऍलिटी कंपनी' च्या एकूण १८ मालमत्तांवर टाच आणली आहे. या थकबाकीदार कंपनीकडे भूखंड करनिर्धारणापोटी एकूण १७८ कोटी ६४ लाख रूपयांची थकबाकी प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने संपूर्ण १८ मालमत्तांवर जप्तीची नोटीस चिकटविण्यात आली आहे. येत्या २१ दिवसात कर भरणा न केल्यास कलम २०४, २०५ अंतर्गत मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करुन लिलाव केला जाणार आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण

अभिनेत्री आलिया भटला असिस्टंटने लावला ७७ लाखांचा चूना

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश