Wednesday, March 19, 2025
HomeदेशSocial Media : सोशल मीडियावर टाकलेल्या लग्नाच्या फोटोंमुळे १७ वर्षीय मुलीची नरकातून...

Social Media : सोशल मीडियावर टाकलेल्या लग्नाच्या फोटोंमुळे १७ वर्षीय मुलीची नरकातून सुटका

राजस्थानमधील तस्करीचा भयंकर प्रकार उघड

मैनपुरी : एका साध्या सोशल मीडिया (Social Media) पोस्टमुळे १७ वर्षीय मुलीच्या आठ महिन्यांच्या दुर्दैवी नरकाच्या प्रवासाचा शेवट झाला. राजस्थानमधील एका पुरुषाच्या ऑनलाइन लग्नाच्या फोटोंमुळे तिच्या तस्करीचा आणि अत्याचाराचा भयंकर गुंता पोलिसांनी उलगडला.

या घटनेला १८ मे २०२४ पासून सुरुवात झाली. मैनपुरी येथील कोचिंग क्लासला जात असताना, ओळखीच्या एका पुरुषाने या मुलीचे अपहरण केले. तिला वेटिंग कारमध्ये जबरदस्तीने बसवून गुंगीचे औषध देण्यात आले. त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुढील आठ महिन्यांत, तिला एक शहर सोडून दुसऱ्या शहरात तस्करी करण्यात आले. या काळात तिच्यावर अनेकदा बलात्कार झाला, विक्री केली गेली आणि पुन्हा विकण्यात आले. शेवटी, तिला राजस्थानच्या अजमेरमध्ये पोहोचवण्यात आले. जिथे विष्णू माळी नावाच्या व्यक्तीने तिला ३.५ लाख रुपयांना विकत घेतले. तो तरुण स्वतःसाठी एक “वधू” शोधत होता.

Mahakumbh Accident : महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात! १० जणांचा मृत्यू, १९ गंभीर

ब-याच प्रयत्नानंतर वधू सापडल्याने विष्णू माळीने लग्नाच्या उत्साहात त्याचे आणि त्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हाच फोटो मैनपुरीपर्यंत पोहोचला आणि काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीची ओळख उघड झाली. स्थानिक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राजस्थान पोलिसांच्या मदतीने विष्णू माळीला अटक केली आणि मुलीला सुखरूप परत आणले.

पोलीस तपासात उघड झाले की, नीरज नावाच्या व्यक्तीने तिला पहिल्यांदा अपहरण करून इटावामध्ये नेले. तेथे तिला ड्रग्ज देऊन बलात्कार करण्यात आला आणि आग्र्यातील रवी व बॉबी नावाच्या व्यक्तींना विकण्यात आले. यानंतर, तिला अजमेरमध्ये तस्करी करण्यात आले आणि स्थानिक आशा जैन या महिलेने तिला पुन्हा विकले. अखेर, विष्णू माळीशी तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.

माळीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना योग्य मुलगी मिळण्यात अडचण येत असल्याने त्यांनी “वधू खरेदी” केली.

दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी अनेक महिने आपल्या मुलीचा शोध घेतला आणि हरवलेली मुलगी शोदण्यासाठी पोलिसांकडे वारंवार मदत मागितली.

या प्रकरणावर मैनपुरीचे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) अनिल कुमार म्हणाले, की, “सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासात मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. सर्व आरोपींवर बलात्कार, अपहरण, मानवी तस्करी आणि पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.”

सध्या मुलगी सुरक्षित आहे, मात्र मानसिक आघातातून सावरण्यासाठी तिच्यावर उपचार सुरू आहेत. असे असले तरी या घटनेने पुन्हा एकदा देशातील मानवी तस्करीच्या भयावह वास्तवाकडे लक्ष वेधले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -