
नागपूर : नागपुरात GBS आजाराने आणखी एका रुग्णाचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे मुंबईनंतर नागपूरमध्येही एका रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. GBS च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

नवी मुंबई : रेल्वेप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेलहून ठाण्याकडे येणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकलसेवा ठप्प ...
मुंबईतील नायर रुग्णालयात GBS आजाराने बळी गेल्याची बातमी ताजी असतानाच आता नागपूर येथील पार्डी परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय रुग्णाचा GBSने बळी घेतला आहे. रुग्णाला ११ फेब्रुवारी रोजी पक्षाघाताचा झटका आल्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णाचे दोन्ही हात आणि पाय पक्षाघातामुळे लुळे पडले. त्याला श्वास घ्यायला आणि रक्तदाबाचा त्रासही होत होता.
शुक्रवारी या रुग्णाची प्रकृती खराब झाली असता त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. दरम्यान पुण्यात ८, मुंबईत १ आणि नागपूरमध्ये १ अशा १० रुग्णांचा मृत्यू GBS मुळे झाला आहे. यावर सरकार ठोस पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल