मुंबईत बँकेबाहेर खातेधारकांची गर्दी
मुंबई : नियमांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने गुरुवार, दि. १३ जानेवारी रोजी बँकेत पैसे ठेवण्यावर आणि काढण्यावर बंदी घातली आहे. आता बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही. मुंबईतील अंधेरी येथील विजयनगर शाखेबाहेर जमलेले खातेदार त्यांचे पैसे कधी मिळतील याबद्दल गोंधळलेले आहेत. काही लोकांनी सांगितले की, बँक त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत आणि त्यांच्या ग्राहक समर्थन सेवा आणि अॅप देखील काम करत नाहीत. आरबीआयने म्हटले आहे की, बँकेच्या सध्याच्या रोख स्थितीमुळे, बचत बँक किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील मोठ्या प्रमाणात अनियमतता झाल्याने बँकेच्या कामकाजावर अनेक प्रकारच्या बँकिग व्यवसायाशी संबंधित निर्बंध घातले आहेत. आरबीआयने गुरुवारी १३ फेब्रुवारीला बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत.
आरबीआयच्या कठोर भूमिकेनंतर या बँकेला ग्राहकांना कर्ज देता येणार नाही. याशिवाय ग्राहकांकडून ठेवी घेण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. बँकेचे खातेधारक आता त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. आरबीआयने सध्या बँकेवर केवळ सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे या काळात बँकेची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. सहा महिन्यानंतर आरबीआय त्यांच्या निर्णयाचे पुनरावलोकन करेल.
आरबीआयने म्हटले आहे की, बँकेकडील सध्याची रोकड स्थिती पाहता हा निर्देश देण्यात येतो की ठेवीदारांच्या बचत खाते किंवा चालू खात्यातील, इतर खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये. मात्र, बँक कर्मचाऱ्यांचे वेतन, भाडे आणि वीज बील यासाठी आवश्यक गोष्टींवर खर्च करण्यास बँकेला परवानगी देण्यात आली आहे.
आरबीआयनं स्पष्ट केले आहे की, १३ फेब्रुवारी २०२५ ला बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर बँक आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज देणार नाही किंवा अॅडव्हान्स रक्कम देईल किंवा कर्जाचे नुतनीकरण करणार नाही. याशिवाय बँकेला ना गुंतवणुकीची परवानगी असेल ना ठेवी स्वीकारण्याची किंवा कोणतीही देणी देण्याची सूट असेल. बँकेत अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे नियामक गोष्टी आणि बँकेच्या ठेवीदारांच्या हितांच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पात्रताधारक ठेवीदार डिपॉजिटर्स डिपॉजिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरशेनकडून त्यांच्या ठेवीवर ५ लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉजिट इन्शूरन्स क्लेम मिळवण्यास पात्र आहेत.
आरबीआयकडून कर्ज देण्यास बंदी
आरबीआयने या बँकेला कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यास बंदी घातली आहे. याशिवाय बँकेतून पैसे काढणेही बंद करण्यात आले आहे. बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. जेणेकरून भविष्यात बँका कोलमडणार नाहीत आणि लोकांचा पैसा सुरक्षित राहील.
मुंबईत सहकारी बँकेच्या नवीन शाखा
या बँकेच्या अंधेरी, वांद्रे, बोरिवली, चेंबूर, घाटकोपर, गिरगाव, गोरेगाव, नरिमन पॉइंट, कांदिवली, मालाड, मुलुंड, सांताक्रूझ आणि वर्सोवा येथे सहकारी बँका आहेत. मुंबई व्यतिरिक्त या बँकेच्या नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि सुरत येथेही शाखा आहेत.