दतिया : मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यात फायरिंग रेंजमध्ये स्फोट झाला. या स्फोटात १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. ही घटना दतिया शहरापासून सुमारे ८० किमी अंतरावर घडली. एक न फुटलेला तोफगोळा उचलण्याचा प्रयत्न १७ वर्षांच्या मुलाने केला. नेमका त्याचवेळी स्फोट झाला आणि मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. जखमींपैकी एकाचे वय २३ आणि दुसऱ्याचे वय १६ असल्याचे समजते. हे तिघे जण फायरिंग रेंज पासून काही किमी अंतरावर असलेल्या गावात वास्तव्यास होते. नेमकी कोणत्या कारणामुळे ही मुले फायरिंग रेज असलेल्या परिसरात आली आणि त्यांनी न फुटलेला तोफगोळा उचलण्याचा प्रयत्न का केला, हे अद्याप समजलेले नाही. फायरिंग रेंज परिसरातील दुर्घटना शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली. जैतपूर गावाजवळ ही दुर्घटना घडली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
मध्य प्रदेशातील दतियात स्फोट, १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
