Mumbai News : नागपूर-सिकंदराबाद-वंदे भारत एक्स्प्रेस आता आठ डब्यांसह चालणार

मुंबई  : बुधवार १९ फेब्रुवारी पासून गाडी क्रमांक २०१०१/२०१०२ नागपूर-सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांऐवजी ८ डब्यांसह चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ३३.८१% आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचा सरासरी प्रवास दर हा ३३.८७% आहे. डब्यांच्या संख्येत कपात केल्याने सेवा कार्यक्षमता वाढेल,गाडीची वेळ सुधारेल आणि उच्च-तंत्रज्ञानाच्या रोलिंग स्टॉकचा योग्य वापर होईल, तसेच प्रवाशांना प्रीमियम वंदे भारतचा अनुभव मिळेल.



हा उपक्रम प्रवर्तन आणि संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेशी सुसंगत असून ज्यामुळे गरजेनुसार आणि वापरानुसार आधुनिक तंत्रज्ञान प्रवाशांना मिळेल असा विश्वास रेल्वेला आहे . या बदलामुळे सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही आणि प्रवाशांना जलद प्रवास, सुधारित आराम आणि अत्याधुनिक ऑनबोर्ड सुविधांसह जागतिक दर्जाच्या सुविधांचा आनंद
घेता येईल.

Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट