Mahalaxmi Express : महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग, प्रवाशांनी चेन ओढल्यामुळे अनर्थ टळला

कोल्हापूर : कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री कोल्हापूर ते रुकडी दरम्यान अचानक महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग लागल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. दरम्यान प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखत चेन ओढल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. आग विझल्यानंतर रात्री साडेदहा नंतर गाडी पुढे नेण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (क्रमांक १७४१२) ला कोल्हापूर मिरज दरम्यान पंचगंगा नदीनजीक आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी (१३ फेब्रुवारी )रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून महालक्ष्मी एक्सप्रेस रुकडी वळिवडे दरम्यान पंचगंगा पुलानजीक आली असता वातानुकूलित बोगीचे चाक जाम होवून रूळाशी घर्षण झाल्याने ठिणग्या उडाल्या. दरम्यान, ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेची चेन ओढून गाडी थांबवली. यावेळी गाडीचे इंजन पंचगंगा पुलादरम्यान थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना पाचारण करून आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही.



दरम्यान, चालक आणि गार्डने ट्रेनची पाहणी केली असता एम - २ या वातानुकूलित बोगीच्या चाकाला घर्षणामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले. गाडीतील आग रोधक सिलिंडरने आग विझवून ती मिरजेकडे रवाना झाली. मिरजेमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोगीची पाहणी करून गाडी सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर तब्बल एक तासाने ती मुंबईकडे रवाना झाली. ही ट्रेन रात्री साडेदहानंतर मुंबईच्या दिशेने पुढे नेण्यात आली. दरम्यान ट्रेनला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

Comments
Add Comment

Navi Mumbai : कामोठे येथे सिलिंडर स्फोटानंतर घरात आग; दोघांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका घरात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची

राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या कांद्याने आणखी भाव कोसळण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांची वाहनखरेदी धडाक्यात, गतवर्षी पेक्षा यंदा १,१५२ वाहनांची वाढ

पुणे : पुणेकरांनी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मी

गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय