
मुंबई : मुंबई पुणे महामार्गावरील नवीन बोगद्यात विचित्र अपघात घडला आहे. पाच वाहन एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या अपघातामुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती.

मुंबई : मुंबईतल्या बँकेला RBI ने मोठा धक्का दिल्याची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह ...
आज (दि १४) पहाटे पाच वाजता मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटातील नवीन बोगद्यात अपघात झाला. सिमेंट बल्कर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची धडक पुढील चार वाहनांना बसून हा अपघात झाला. या अपघातामध्ये सिमेंट बल्करचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.

मुंबई (प्रतिनिधी) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३' भुयारी मार्गिकेवरील बीकेसी- कुलाबा टप्पा मार्गिकेचे ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील ...
या अपघातात बोगद्यामध्ये एक टेम्पो उलटला असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात वेळ गेल्याने मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटना स्थळी पोलीस दाखल झाल्याने दुर्घटना टळली.