Donald Trump : बांग्लादेशचा निर्णय आता पंतप्रधान मोदीच करतील - डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंगटन डीसी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या आज (१४ फेब्रुवारी) झालेल्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच दोघांच्या या बैठकीत बांग्लादेशच्या मुद्यावर सुद्धा चर्चा झाली. भारताला त्रास देणाऱ्या बांग्लादेशचा निर्णय आता पंतप्रधान मोदीच करतील अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी देऊन टाकली.


बांग्लादेशात सध्या अराजकतेची स्थिती आहे. येथील अल्पसंख्यांक हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. या हल्ल्यांना रोखण्यात बांग्लादेशातील अंतरिम सरकार अपयशी ठरले आहे. या संकटात अमेरिकेची कोणतीच भूमिका नाही असे ट्रम्प म्हणाले. आता बांग्लादेशचा जो काही निर्णय करायचा असेल तो पीएम मोदीच करतील असेही ट्रम्प यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी बांग्लादेशातील संकटाबाबत म्हणाले की, बांग्लादेशातील संकटात अमेरिकेचा काहीच सहभाग नाही. बांग्लादेशच्या मुद्द्यावर उपाय शोधण्याची जबाबदारी मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवत आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची गुरुवारी (१३फेब्रुवारी) ओव्हल ऑफीसमध्ये चर्चा झाली. या दरम्यान व्यापारापासून ते अवैध प्रवासी अशा महत्वाच्या मुद्द्यांचा यात समावेश होता. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात विविध घोषणा आणि निर्णयांची माहिती दिली.बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. भारताने शेख हसीना यांना बांग्लादेशच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली जात आहे. परंतु, भारत सरकारने असा कोणताच निर्णय घेतलेला नाही. भविष्यातही असा काही निर्णय होईल याची काहीच शक्यता नाही. बांग्लादेशातील सत्ताधाऱ्यांकडून विविध मार्गांनी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Comments
Add Comment

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट