Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीकाँक्रिटीकरणाची कामे सुरू; रस्त्यावरच वाहने उभी

काँक्रिटीकरणाची कामे सुरू; रस्त्यावरच वाहने उभी

रस्ते कामाची गुणवत्ता, दर्जा कसा राखला जाणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईतील अनेक भागांमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून काँक्रिटीकरण कामांचा दर्जा, गुणवत्ता यांच्याशी कदापि तडजोड खपवून घेतली जाणार नाही, याची दक्षता बाळगा, असे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. परंतु एका बाजुला रस्त्यांची कामे सुरु असलेल्या जागेवरच अनधिकृत वाहने उभी केली जातात, तिथे रस्ते बांधकामाचा दर्जा कसा गुणवत्ता पूर्वक राखला जाणार असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. टप्पा १ मधील ७५ टक्के कामे आणि टप्पा २ मधील ५० टक्के कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार रस्ते कामाला वेग आला आहे. मात्र, सांताक्रूझ पूर्व येथील हयात हॉटेलपासून हनुमान मंदिर ते वाकोला वॉटर वर्क्स यार्डपर्यंत असलेल्या गावदेवी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

एमएसआरडीसीच्या माध्यमातून महापालिकेने जिओ नेटिंगचा केला प्रयत्न

या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम काही स्वरुपात झाले असून शेवटच्या टप्प्यात हे काम आहे. परंतु या रस्त्याचे अर्धवट काम झालेले असतानाच सुरु असलेल्या रस्त्यांवरच आसपासच्या रहिवाशांची वाहने, रिक्षा तसेच खासगी ओलाची वाहने उभी केली जात आहेत. या रस्त्यावरच आधीपासून दाटीवाटीने रिक्षा आणि इतर वाहने उभी केली जात असल्याने याठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होत असते. परंतु आता सिमेंटीकरणाचे काम सुरु असतानाच त्यावर वाहने उभी करून ठेवल्याने रस्ते कामांत मोठ्या अडचणी येत आहे. अशाप्रकारे वाहने काम सुरु असलेल्या रस्त्यांवर उभी केली जात असल्याने या रस्ते कामाची गुणवत्ता आणि दर्जा कसा राखला जाणार असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -