Thursday, May 15, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Mahakumbh Mela 2025 : मुख्यमंत्री फडणवीसांनी सहकुटुंब केले त्रिवेणी संगमात स्नान

Mahakumbh Mela 2025 : मुख्यमंत्री फडणवीसांनी सहकुटुंब केले त्रिवेणी संगमात स्नान

प्रयागराज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शुक्रवारी प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात पोहोचले. यावेळी त्यांनी सहकुंटुंब त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.





मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयागराजच्या अरैल घाटावर जाऊन त्यांनी संगमात आस्थेची पवित्र डुबकी घेतली. प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, आई सरीता फडणवीस आणि मुलगी दिवीजा फडणवीस यांनीदेखील त्रिवेणीच्या संगमात पवित्र स्नान केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, तब्बल १४४ वर्षांनंतर होणाऱ्या तीर्थराज प्रयागच्या महाकुंभाच्या भव्य समारंभाची व्यवस्था. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या सरकारची ही एक मोठी कामगिरी आहे, एक हिंदू म्हणून मीही येथे पवित्र स्नान करण्यासाठी आल्याचे फडणवीस यांनी आपल्या ट्विटर (एक्स) पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Comments
Add Comment