Saturday, June 21, 2025

अल्पवयीन मुलीला फसवून अत्याचार करणा-या नराधमासह त्याचा मित्र आणि आजोबाविरूद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला फसवून अत्याचार करणा-या नराधमासह त्याचा मित्र आणि आजोबाविरूद्ध गुन्हा दाखल

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केले अत्याचार


दापोली : अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून प्रेमसंबंध निर्माण करून तिचे आक्षेपार्ह फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील तरुणाविरुद्ध दाभोळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुजल अहिलेश खळे असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ६४ (१), २ (झ) (ड), ३ (५), ३५१ (२) ३५२ सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधि. २०१२ चे कलम ४, ६, ८, १२, माहिती तंत्रज्ञान अधि. २००० चे कलम ६६ (इ) प्रमाणे दाभोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संशयित सुजल अहिलेश खळे याच्यासोबत यामध्ये आरोपीला मदत करणारा कौस्तुभ हरावडे आणि संशयित तरूणाचे आजोबा गोविंद खळे सर्व रा. मु. पो नानटे, ता. दापोली यांना देखील सहआरोपी करण्यात आले आहे.



दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुजल अहिलेश खळे याने अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले होते. या दरम्यान तिचे काही आक्षेपार्ह फोटो मोबाईलवरून काढत तो या युवतीला सातत्याने व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करत होता.


तसेच सुजल खळेने त्याचा मित्र कौस्तुभ हरावडे याच्याशीही संबंध ठेवण्याची धमकी अल्पवयीन मुलीला दिली होती. तर सुजल याचे आजोबा गोविंद खळे यांनी मुलीला आणि तिचे काका यांना मारण्याची धमकी दिली होती.


त्यामुळे या पीडित मुलीने आचोळे पोलीस ठाणे, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय जिल्हा पालघर येथे हजर राहुन तक्रार दिली होती. दरम्यान, ही तक्रार दाभोळ पोलीस स्टेशनला शून्य नंबरने वर्ग करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि अमोल गोरे करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा