Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीBhiwandi : भिवंडीतील पांडवकुंडात सापडलं पुरातन शिवलिंग!

Bhiwandi : भिवंडीतील पांडवकुंडात सापडलं पुरातन शिवलिंग!

भिवंडी : महाशिवरात्री (Mahashivratri 2025) अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. या दिवशी राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच महादेवाच्या दर्शनासाठीदेखील भक्तांच्या रांगा लागल्या असतात. या पार्श्वभूमीवर भिवंडी (Bhiwandi News) येथे पांडवगडावरील कुंडात पुरातन शिवलिंग सापडले आहेत. महाशिवरात्री पूर्वीच हा चमत्कार घडल्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Purandar Airport : पुरंदर विमानतळाला गती देण्यासाठी ‘कनेक्टिव्हिटीला’ प्राधान्य!

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील वाहुली गावालगतच्या पठारावरील जंगलात पुरातन पांडव कुंड आहे म्हणून या पठाराला पांडव गडाने‌ देखील ओळखले जाते. शिवरात्री निमित्ताने साफ-सफाई करण्यासाठी काही तरूण तेथे गेले. यादरम्यान कुंडाच्या साफ-सफाईवेळी कुंडातील पाणी व गाळ काढत असताना अचानक कुंडाच्या तळाशी पुरातन असे शिवलिंग व पादुका आढळून आल्या. शिवलिंग आढळून आल्याचे पाहताच तरुणांनी या संदर्भाची माहिती तातडीने पोलिस व वनविभागाला दिली.

दरम्यान, पोलिस व वनविभागाचे कर्मचारी पांडवगडावर दाखल होत अधिक तपास सुरु केला. तसेच यावेळी शिवस्वरूपानंद‌ स्वामी व‌ माधव महाराज भोईर हे देखील गडावर पोहचले. स्वामींनी या तिर्थाला आजपासून पांडूकेश्वर नावाने ओळखले जावे असे घोषित केले. याचबरोबर शिवलिंग सापडल्याने या ठिकाणी यंदा भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Bhiwandi News)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -