Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीChinese Apps : टिकटॉक परत येणार? बॅन झालेले 'हे' चिनी अ‍ॅप्स भारतात...

Chinese Apps : टिकटॉक परत येणार? बॅन झालेले ‘हे’ चिनी अ‍ॅप्स भारतात पुन्हा सुरू

मुंबई : भारताने २०२० मध्ये टिकटॉक, शीन यासह तब्बल २६७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. सुरक्षा, डाटा प्रायव्हसी आणि गलवान व्हॅलीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला (Chinese Apps) होता. मात्र पाच वर्षानंतर बॅन झालेले काही अ‍ॅप्स भारतात पुन्हा सुरु होणार आहेत.

सावधान ! जनगणनेच्या नावाखाली सुरू आहे फसवणूक

भारताने बंदी घातलेले ३६ चिनी अ‍ॅप्स पुन्हा प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहेत. यापैकी काही अ‍ॅप्सचे रिब्रँडिंग झालेले आहेत. तर काहींनी मालकी हक्क बदलले आहेत. कायदेशीररित्या अ‍ॅप्स चालवता यावेत यासाठी भारतीय कंपन्यांशी करार करण्यात आले आहेत. यामध्ये झेंडर, मँगोटीव्ही, युकू, ताओबाओ, टॅटन यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

  • Xender : फाइल शेअरिंग अ‍ॅप आताही Xender म्हणूनच पुन्हा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर आले आहे. मात्र अद्याप हे गुगल प्ले स्टोअरला आले नाही.
  • Mango TV : चिनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या मँगो टीव्हीचं अ‍ॅपही आता दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहे. त्याचे कोणतंही रिब्रँडिंग न करता किंवा मालकी हक्क न बदलता ते दोन्ही प्ले स्टोअरवर दाखवत आहे.
  • Youku : हे चिनमध्ये व्हिडीओ स्ट्रिमींग सेवा पुरवते. ते सुद्धा आता प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले आहे.
  • Taobao : अलिबाबा कंपनीचे शॉपिंग अ‍ॅप असलेलं ताओबाओ रिब्रँडिंग न करता पुन्हा भारतात सुरू झालंय.
  • Tantan : हे डेटिंग अ‍ॅप असून ते एशियन डेटिंग अ‍ॅप म्हणून परतलं आहे.
  • Shein : रिलायन्स रिटेलच्या भागीदारीत हे ॲप पुन्हा लाँच करण्यात आले आहे. यामध्ये फॅशन शॉपिंग अ‍ॅप असलेल्या शीनने रिलायन्ससोबत भागिदारी केली. यामुळे त्यांचा डेटा स्टोरेज भारतातच राहील आणि तो सुरक्षित असणार आहे.

टिक टॉक परतणार?

भारत देशातून या अ‍ॅपला सर्वाधिक पसंती मिळत असल्यामुळे भारताकडून या चिनी अ‍ॅपला चांगला फायदा होत होता. मात्र भारत-चीनमधील तणावामुळे २०२० साली टिक टॉक अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली. दरम्यान, सध्या भारतात ३६ अ‍ॅप्स पुन्हा सुरू झाली असली तरी टिकटॉक परतण्याची मात्र कोणतीही चिन्हे दिसत नाही.

PUBG देखील परत आले

बंदी घातलेला PUBG मोबाइल, दक्षिण कोरियाच्या क्राफ्टन कंपनीच्या अंतर्गत बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) म्हणून परत आला. पण, BGMI वर २०२२ मध्ये पुन्हा बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर भारताच्या सुरक्षा नियमांची पूर्तता केल्यानंतर २०२३ मध्ये अ‍ॅप पुन्हा सुरू करण्यात आले. (Chinese Apps)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -