Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमहसूल पथकावर हल्ल्या केलेले दोन आरोपी गजाआड

महसूल पथकावर हल्ल्या केलेले दोन आरोपी गजाआड

संगमनेर शहरात एलसीबीची कारवाई

संगमनेर : संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूलच्या पथकावर झालेल्या हल्ला प्रकरणातील दोघा मुख्य आरोपींना पकडण्यात आहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींना पकडून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विशाल हौशीराम खेमनर ( वय ३३, रा. अंभोरे, ता. संगमनेर ) व सागर गोरक्षनाथ जगताप ( रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर ) अशी पकडलेल्या दोघा आरोपींची नावे आहे.

संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाचे रात्रगस्तीपथक रविवारी रात्री प्रवरा नदीपात्रात कनोली येथे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. येथे पथकाला जेसीबीच्या सहाय्याने वाळू उत्खनन केले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने जेसीबी तसेच विशाल आबाजी खेमनर आणि प्रवीण शिवाजी गवारी या दोघा उत्खनन करणाऱ्यांना ताब्यात घेत संगमनेरला आणत असताना त्यांचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी घेऊन पळून जाऊ जात असताना पथकाने त्यांचा पाठलाग केला असता जेसीबी चालकाने पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर जेसीबी घातला.

Valentine’s Day : ‘व्हॅलेंटाईन डे’साठी नाशिकच्या गुलाबांना देशभरातून मोठी मागणी

सुदैवाने पथकातील कर्मचारी यातून बचावले असले तरी आरोपीच्या अन्य पाच-सहा साथीदारांनी महसूल पथकाला रस्त्यात आढळून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांचे ताब्यातील जेसीबी घेऊन पळून गेले.याप्रकरणी कामगार तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९, १३२, १८९(२), १९१(२), ३०३(२), ३५२, ३५१ (२) (३), ३५१ (४), २२१ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्कराकडून झालेल्या हल्ल्याची प्राथमिक माहिती मिळताच अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस आमदार मनोहर गोसावी, संदीप दरंदले, सागर ससाने, अमृत आढाव, फुरखान शेख, मेघराज कोल्हे व महादेव भांड यांचे पथक आरोपींच्या मागावर होते.या गुन्ह्यातील आरोपी विशाल हौशीराम खेमनर हा त्याच्या साथीदारांसह संगमनेरमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने शहरात आरोपीचा शोध घेतला असता त्यांना विशाल हौशीराम खेमनर व सागर गोरक्षनाथ जगताप हे दोघे आढळून आले.

पोलीस पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा सोनू मोर (पूर्ण नाव माहित नाही रा. डिग्रस, ता. संगमनेर), तुषार हौशीराम खेमनर (रा. अंभोरे, ता. संगमनेर), लखन मदने (रा. आश्वी, ता. संगमनेर) ताहीर शेख (रा. अंभोरे, ता. संगमनेर) यांच्या मदतीने केला असल्याचे कबूल केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -