भाईंदर (वार्ताहर) : मीरा भाईंदरमधील उत्तन भागातील उबाठाच्या तीन माजी नगरसेवकानी पक्षाला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक बर्नाड डिमेलो, माजी नगरसेवक गोविंद जॉर्जी यांनी माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून फारकत घेतल्यावर मीरा भाईंदर महापालिकेत असलेल्या २२ नगरसेवकापैकी ८ जणांनी प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांना साथ दिली होती.
भाईंदरमधील उबाठाचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
