
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये बसविण्यात आलेल्या 'किऑक्स' मध्ये जगभरातील दुर्मिळ पुस्तक ऑनलाईन वाचण्याची सुविधा आहे.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना,स्पर्धा परीक्षांचे बदलणारे अभ्यासक्रम व सहसाहीत्य ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा जिल्हा ग्रंथालय मुंबई उपनगर मध्ये करणार , त्याचप्रमाणे मुंबई उपनगरातील सर्व ग्रंथालयात ही सुविधा लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर, समन्वय समिती व जिल्ह्यातील सर्व शासन मान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रंथोत्सव २०२४' चे आयोजन केले आहे. मुंबई उपनगर 'ग्रंथोत्सव २०२४' चे पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते मुलूंड पश्चिम येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात उद्धघाटन पार पडले यावेळी या कार्यक्रमात मंत्री ॲड. आशिष शेलार बोलत होते.

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनतर्फे रेल्वे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून ...
मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, महानगरपालिकेलच्या अखत्यारीतील सर फिरोजशहा मेहता ग्रंथालय इमारतीमध्ये मुंबई उपनगरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील सोयी सुविधा देवून या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले.या परिसरातील वाचक, विद्यार्थी ग्रंथ प्रेमींसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबई उपनगरचे तत्कालीन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी कामासाठी पुढाकार घेतला. सर्वांच्या सहकार्याने आज सर्व सोयी सुविधायुक्त ग्रंथालय उभे राहिलेले आहे. ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमध्ये सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्या. स्पर्धा परीक्षांची माहिती देखील आणि पुस्तके देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रंथालयांची मागणी विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा.
स्पर्धा परीक्षांमध्ये मुंबई उपनगर मुंबई शहरातील विद्यार्थ्यांना संधी अधिक मिळाले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.सकाळी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी संजय कुमार शिंदे हे उपस्थित होते. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, प्रकाश गंगाधरे, लेखक चंद्रकांत भोंजाळ, बृहन्मुंबई महापालिकेच्या ग्रंथालय अधिकारी साधना कुदळे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे यासह मुंबई उपनगर मधील विविध ग्रंथालयांचे अध्यक्ष, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.