
मुंबई : केंद्र सरकारकडून (Central Government) महाराष्ट्रातील महिलांसह, विद्यार्थी, लहान मुली, तरुण पिढी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली पीएम किसान योजनेबाबत (PM Kisan Yojana) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत १८ हप्ते देण्यात आले आहेत. तर आता येत्या काही दिवसात १९ वा हप्ता मिळणार आहे.

मुंबई : युट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर समय रैनाचा 'इंडियाज गॉट लॅटेंट' हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला. मुंबई पोलिसांनी ...
पीएम किसान सन्मान योजनेद्वारे आता १३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता चार महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात पैसे दिले जाणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारी रोजी किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
दरम्यान, केवायसी प्रकिया पूर्ण असणाऱ्यांच्याच खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन केवायसी करा, असे आवाहन करण्यात येत आहे. (PM Kisan Yojana)
ऑनलाइन पद्धतीने केवायसी प्रक्रिया
- तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर होमपेजवर लिहलेल्या ई- केवायसी या ऑप्शनवर क्लिक करा.
- यानंतर आधार नंबर टाका सर्च करा.
- यानंतर मोबाईल नंबर टाका. तुम्हाला ओटीपी येईल.
- यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.