मविप्रचे सटाणा महाविद्यालय विद्यापीठात सर्वोत्कृष्ट

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित सटाणा येथील कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मन्साराम सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे आयोजित शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.


याप्रसंगी राज्याचे शालेय उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पद्मश्री डॉ. शंकर अभ्यंकर, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. आर. के. बच्छाव, शालनताई सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे, प्राध्यापकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.



प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या नेतृत्वाखाली नावीन्यपूर्ण उपक्रम, अनोखे संशोधन, उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्यामुळे महाविद्यालयाची पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तीन जिल्ह्यांमधून निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार ग्रामीण भागातील अव्यावसायिक महाविद्यालय या श्रेणीमध्ये देण्यात आला आहे. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि दीड लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, पदाधिकारी, प्राचार्य व प्राध्यापकवृंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार वितरणप्रसंगी उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम, समन्वयक डॉ. राजेंद्र वसईत, डॉ. साहेबराव कांबळे, डॉ. एस. बी. आंधळे, प्रा. निलेश पाटील, प्रा. अमित निकम, डॉ. आर. बी. अहिरे, प्रा. तुषार खैरनार, प्रा. स्वप्निल शेंडगे, प्रा. सागर माने, प्रा. आदेश राऊत, प्रा. संदीप कुरकुटे, दीपक वाघ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


मविप्र संस्थेने सुरू केलेले बागलाण तालुक्यातील हे पहिले महाविद्यालय आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे पाठबळ, शिक्षकांंचे कठोर परिश्रम, त्यांंनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आणि विद्यार्थी-पालकांचे सहकार्य यामुळे अशा प्रकारचे यश गाठणे शक्य आहे. - ॲॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र


सटाणा महाविद्यालयाला गेल्या वर्षीच विद्यापिठाच्या नॅक कमिटीतर्फे ‘ए’ मानांकन मिळालेले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा या अभियानांतर्गत तालुकास्तरावर पहिले आणि जिल्हास्तरावर तिसऱ्या क्रमांकाचे तीन लाखांचे पारितोषिक पटकावले आहे. महाविद्यालयाने शासकीय शिष्यवृत्तीव्यतिरिक्त हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची तब्बल २१ लाख २० हजार ४०० रुपयांची शिष्यवृत्ती ५५० विद्यार्थ्यांना मिळवून दिली आहे. - डॉ. विजय मेधणे, प्राचार्य


Comments
Add Comment

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने

Nashik 400 Crore Cash Robbery : नाशिकमधील ४०० कोटींच्या कथित रोख लुटीने खळबळ, धक्कादायक खुलासा; ‘लूट झालीच नाही’

नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.

Devendra Fadnavis: “दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्रीरामाची आठवणही झाली नाही”

नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या सभेतून उद्धव आणि राज यांच्यावर

Nashik News: कडाक्याच्या थंडीने घेतला पहिला बळी, निफाडमध्ये 22 वर्षीय तरुणाचा मृत्यु

नाशिक:निफाड तालुक्यात कडाक्याच्या थंडीने पहिला बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवगाव (ता. निफाड)

Nashik Accident : भरधाव वाहनाची मागून दुचकीला जोरदार धडक! नवरा बायकोचा जागीच मृत्यु; थरारक अपघात

नाशिक : महाराष्ट्रामध्ये वाहनांच्या अपघातांची मालीका सुरुच.. काल मंगळवारी साक्री-शिर्डी राष्टिय महामार्गावर

नाशिकच्या दोन माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या