मुंबई : नुकतेच माघी गणेशोत्सव राज्यभरात पार पडला. यावेळी कांदिवलीत प्रसिद्ध असणारा चारकोपच्या राजाची मूर्ती पीओपीची असल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. पर्यावरणाला हानिकारक असलेली पीओपी मूर्ती समुद्राला मोठ्या प्रमाणात अशुद्ध करू शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या मूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई केली होती. विसर्जन न झालेली ही एकच मूर्ती नसून मुंबईतील अशा ११ मुर्त्यांचे विसर्जन थांबवले गेले होते. दरम्यान यावर महानगरपालिकेने तोडगा काढत मंडळांना कृत्रिम तलाव निर्माण करून देऊन त्यामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे आदेश दिले. मात्र पीओपीच्या मूर्तींवर बंदी असली तरीही अनेक मंडळ पीओपीच्या गणेश मूर्ती स्थापन करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे याबाबत आता पालिकेने कठोर निर्णय हाती घेतला आहे. (Ganeshotsav 2025)
Nitesh Rane : नितेश राणे बदलत आहेत कोकणातल्या राजकीय वर्तुळातले फासे
पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवाला ६ महिने शिल्लक असताना या पार्श्वभूमीवर सण-उत्सवा संबंधित बाप्पाच्या मूर्ती या शाडू मातीच्याच हव्या, असे स्पष्ट केले आहे. मुंबईत पीओपीच्या मूर्तींसाठी कठोर बंदी कायम राहणार असून, त्यासाठी पालिकेकडूनच मोफत आणि गरज असेल तितकी माती मूर्ती कलाकार आणि व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होणार आहे.
गणेशमूर्तींच्या उंचीवरही घेणार निर्णय
प्रशासनाकडून पीओपी मूर्तींबाबत निर्णय घेतला असताना आता गणरायाच्या गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अनेकदा मूर्तींच्या उंचीमुळे मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करता येत नाही. त्यामुळे मूर्तीच्या उंचीसंदर्भातही निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. (Ganeshotsav 2025)