Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीSNDT Collage : राज्यपालांकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा

SNDT Collage : राज्यपालांकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा

मुंबई : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव यांनी राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांची गुरुवारी (दि. १३) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्यापुढे विद्यापीठाचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी कुलगुरूंनी राज्यपालांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, भारतीय ज्ञान, संस्कृत तसेच योग केंद्राची माहिती, भाषांतर प्रकल्पाचे कार्य, उच्च शिक्षण संस्था संस्थांमध्ये आंतरवासिता धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक वेळापत्रक, विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र, संस्कृत भाषा विभागाचे सबळीकरण, वसतिगृह सुविधा, शाळांशी संवाद, स्वच्छ भारत अभियान, विकसित भारत, विदेशी विद्यापीठांशी सहकार्य, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी उपक्रम, क्रीडा विकास, विद्यापीठाच्या सर्वोत्तम प्रथा, कौशल्य विकास कार्यक्रम इत्यादी विषयांची सविस्तर माहिती दिली.

Ratnagiri : नवग्रह मंदिरात शनिवारपासून नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा

बैठकीला विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ. रुबी ओझा, कुलसचिव विलास नांदवडेकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. हिम्मत जाधव आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -