मोहिनीराज यात्रेत आई जगदंबेचा गजर करत भळंद रंगला

  82

लखलखत्या अग्नीला तळहातावर घेऊन ‘भळंद’


नेवासा : भगवान विष्णूचे मोहिनी अवताराचे एकमेव स्थान असलेल्या नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवानिम्मित मोहिनी मायच्या जयघोषात आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत बुधवार १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात "भळंद" कार्यक्रम पार पडला.


रथ सप्तमी पासून सुरु झालेल्या ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रेमुळे नेवासा शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण आहे.माघ शुध्द पोर्णिमेच्या राञी मंदिरा समोर उभारण्यात आलेल्या मंडपात संबळाच्या निनादात गोंधळ घालीत "भळंद" खेळत देव देवतेला यात्रा उत्सवाचे निमंत्रण दिल गेले आहे. तर दिगंबर गोंधळी यांनी संबळाच्या निनादात देवीची भक्ती गीते गायली त्यांना राजेंद्र परदेशी, निखिल जोशी सुभाष चव्हाण यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली.श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेणुकादेवी आश्रमाचे अदिती जोशी, आदिनाथ जोशी, आर्यन जोशी यांनी लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात "भळंद" कार्यक्रमाद्वारे देवदेवतांना मोहिनीराजांच्या यात्रेचे निमंत्रण दिले.



भळंद कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली यावेळी शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.भळंद कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली. बोल मोहिनीराज महाराज की जय... असा जयघोष यावेळी करण्यात आला. झालेल्या भळंद कार्यक्रमाचे पौरोहित्य पांडूगुरू जोशी, निखिल जोशी यांनी केले.

Comments
Add Comment

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका तयारीला

इगतपुरीतील तीनलकडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त

इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील तीनलकडी पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावर मोठ्या

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक