Saturday, May 10, 2025

देशमनोरंजनब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Samay Raina : कॉमेडीयन समय रैनाच्या अडचणीत वाढ! आगामी सर्व शो रद्द

Samay Raina : कॉमेडीयन समय रैनाच्या अडचणीत वाढ! आगामी सर्व शो रद्द

मुंबई : कॉमेडीयन समय रैना (Samay Raina) सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'इंडियाज गॉट लेटन्ट'शो (Indias Got Latent) मध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने अश्लील कमेंट केल्या. त्यामुळे समय रैना आणि रणवीरवर कारवाई करण्यात आली. अशातच समयला आणखी एक मोठा फटका बसला आहे. गुजरातमध्ये होणारे समयचे आगामी सर्व शो रद्द करण्यात आले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, 'इंडियाज गॉट लेटन्ट' शोमध्ये अश्लील कमेंट केल्यामुळे लोकांमध्ये असलेल्या तीव्र नाराजीला गृहीत धरुन समय रैनाचे गुजरातमधील आगामी सर्व शो रद्द करण्यात आले आहेत. 'समय रैना अनफिल्टर्ड' हा त्याचा शो १७ एप्रिलला सूरतमध्ये, १८ एप्रिलला वडोदरा, १९ आणि २० एप्रिलला अहमदाबादमध्ये दोन शो होणार होते. परंतु हे सर्व शो रद्द करण्यात आले आहेत. जशी तिकीट विक्री सुरु झाली तसं यापैकी काही शो हाऊसफुल्लही झाले. त्याचे तिकीट बूक माय शो वर उपलब्ध होते. परंतु आता हे तिकीट बुक माय शोवर दिसत नाही. त्यामुळेच गुजरातमधील समयचे सर्व शो रद्द करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे समयचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.


दरम्यान, समयने काल इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करुन लिहिले की, "हे सर्व घडत आहे ते हाताळणे माझ्यासाठी खूप कठीण होत आहे. मी माझ्या चॅनलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणे आणि त्यांचा चांगला वेळ जावा हेच माझे ध्येय होते. मी तपास यंत्रणांना सहकार्य करेन जेणेकरून त्यांचा तपास निष्पक्षपणे होईल. धन्यवाद,"

Comments
Add Comment