Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले. आता ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या तीन सर्वोत्तम गोलंदाजांशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उतरणार आहे.

Sanju Samson : संजू सॅमसनच्या हाताच्या बोटावरील शस्त्रक्रिया यशस्वी

कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड आधीच स्पर्धेतून बाहेर पडले होते. पॅट कमिन्स घोट्याच्या दुखापतीतून बरा होऊ शकला नाही. २०२४-२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान कमिन्सलाही या समस्येचा त्रास झाला होता. तर हेझलवुडला कंबरेचा त्रास होता. याशिवाय, मिचेल मार्शला दुखापतीमुळे आधीच बाहेर ठेवण्यात आले आहे. तर मार्कस स्टोइनिसने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याचा अर्थ ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात एकूण पाच बदल करावे लागले आहेत.

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, या खेळाडूंचा समावेश

कांगारुंच्या संघामध्ये शॉन अॅबॉट, बेन द्वारशुइस, स्पेन्सर जॉन्सन, जेक-फ्रेसर मॅकगर्क आणि तनवीर संघा यांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आले आहे. शॉन अॅबॉट, बेन द्वारशुइस आणि स्पेन्सर जॉन्सन हे वेगवान गोलंदाज आहेत. तन्वीर संघा हा भारतीय वंशाचा लेग स्पिनर आहे, फ्रेझर-मॅकगर्क हा एक सलामीवीर फलंदाज आहे. दुसरीकडे, २१ वर्षीय फिरकी गोलंदाज अष्टपैलू कूपर कॉनोलीला प्रवासी राखीव संघात स्थान देण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करेल.

Ind vs Eng: टी-२० नंतर वनडेतही भारताची बाजी, इंग्लंडला दिला व्हाईटवॉश

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स केरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झांप्या

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -