Tuesday, May 13, 2025

महामुंबईमहाराष्ट्रमनोरंजनमहत्वाची बातमी

'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे'च्या पोस्ट डीलीट, सईचा शो पण रद्द

'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे'च्या पोस्ट डीलीट, सईचा शो पण रद्द
मुंबई : युट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर समय रैनाचा 'इंडियाज गॉट लॅटेंट' हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून सायबर सेलने ४० जणांविरोधात FIR नोंदवली आहे. शो मध्ये सहभागी झालेले सदस्य तसेच शो चे परीक्षक या सर्वांचे जबाब नोंदवण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. या घटनेचा धसका मराठी युट्यूब चॅनेल भाडिपाने घेतला आहे.



'भारतीय डिजिटल पार्टी' म्हणजेच 'भाडिपा' या युट्यूब चॅनेलवर 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' हा कार्यक्रम अलिकडेच सुरू झाला होता. या शोचा पहिला एपिसोड अभिनेत्री भाग्यश्री लिमयेसह पार पडला होता. आता १४ फेब्रुवारी रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये सुपरस्टार सई ताम्हणकर सहभागी होणार होता. मात्र इंडियाज गॉट लॅटेंटच्या प्रकरणामुळे 'तापलेल्या वातावरणात' भाडिपाने हा शो पुढे ढकलला आहे. शिवाय या शोसाठी ज्यांनी तिकिटे बुक केली होती त्यांना पैसे परत दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शो संदर्भातील आतापर्यंतच्या सर्व पोस्ट भाडिपाच्या सोशल मीडियावरुन हटवण्यात आल्या आहेत. सई ताम्हणकर स्पेशल 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' हा कार्यक्रम पुढे ढकलला, याबद्दल जाहीर सूचना देणारी पोस्टही हटवण्यात आली आहे.

Comments
Add Comment