बंगळुरू : मूळचा इंजिनिअर असलेला ओडिशाचा रॅपर अभिनव सिंह याने बंगळुरूतील कडूबीसनहल्ली येथील घरी आत्महत्या केली. तो ३२ वर्षांचा होता. अभिनवच्या आत्महत्येप्रकरणी मराठाहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपर असलेला अभिनव एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस तपास सुरू आहे.
पत्नीशी वाद झाल्यामुळे विष पिऊन रॅपर अभिनव सिंह याने आत्महत्या केल्याचा संशय त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. पोलिसांनी अभिनवचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी अर्थात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अभिनववर ओडिशात अंत्यसंस्कार होणार आहेत.